शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या शाळा भाड्याने दिल्यास होणार फौजदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 14:11 IST

महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी गुरुवारी मनपाच्या शाळा भाडेतत्त्वावर दिल्यास संबंधित मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीसह आयोजकांवर फौजदारी दाखल केली जाणार असल्याचा आदेश जारी केला.

ठळक मुद्देकाही मुख्याध्यापकांसह शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी शाळा भाडेतत्त्वावर देण्यास सरसावले होते. ‘अ‍ॅडव्हान्स बुकिंग’ सुरू करण्यात आल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये झळकताच महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी गुरुवारी मुख्याध्यापकांची तातडीने बैठक बोलावली. शाळेचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी तसेच आयोजकांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई केली जाणार असल्याचा आदेश आयुक्त जितेंद्र वाघ यांनी जारी केला.

अकोला : महापालिकेच्या शाळा लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रमासाठी भाडेतत्त्वावर देण्यासाठी काही मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीकडून ‘बुकिंग’ केल्या जात असल्याच्या ‘लोकमत’मधील वृत्ताची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी गुरुवारी मनपाच्या शाळा भाडेतत्त्वावर दिल्यास संबंधित मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीसह आयोजकांवर फौजदारी दाखल केली जाणार असल्याचा आदेश जारी केला. तसेच १२ मे पर्यंत विद्यार्थ्यांच्या खात्यात शालेय गणवेशाची रक्कम जमा न केल्यास कारवाईचा बडगा उगारणार असल्याचा सज्जड दम मुख्याध्यापकांना दिला.महापालिकेच्या शाळांमध्ये अत्यल्प शुल्काची आकारणी करून लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम साजरे केले जात होते. त्याबदल्यात आयोजकांकडून वर्ग खोल्यांसह साहित्याची नासधूस करणे, परिसरात अस्वच्छता पसरविणे, वीज आणि पाण्याचा अमर्यादित वापर करणे आदी प्रकार होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे प्रशासनाने शाळा भाडेतत्त्वावर न देण्याचा निर्णय घेतला. शाळा व्यवस्थापन समितीच्या दुकानदारीला व दबावतंत्राला बळी पडून काही मुख्याध्यापक सुटीच्या दिवशी विविध कार्यक्रमांसाठी शाळा भाड्याने देत असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ चे उल्लंघन केल्यास मुख्याध्यापक, मुख्याध्यापिक ांवर कारवाई करण्याचा आदेश १९ नोव्हेंबर २०१६ रोजी जारी केला होता. अजय लहाने यांची बदली होताच व यंदा शालेय कामकाज आटोपताच काही मुख्याध्यापकांसह शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी शाळा भाडेतत्त्वावर देण्यास सरसावले होते. त्यासाठी ‘अ‍ॅडव्हान्स बुकिंग’ सुरू करण्यात आल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये झळकताच महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी गुरुवारी मुख्याध्यापकांची तातडीने बैठक बोलावली. बैठकीला प्रभारी उपायुक्त तथा शिक्षणाधिकारी अनिल बिडवे उपस्थित होते.

व्यवस्थापन समितीची शिफारस स्वीकारू नका!मनपाच्या शाळा भाड्याने न देण्याचे स्पष्ट निर्देश आयुक्त जितेंद्र वाघ यांनी मुख्याध्यापक, मुख्याध्यापिकांना दिले. शाळा व्यवस्थापन समितीने लग्नसमारंभ असो वा कोणत्याही धार्मिक कार्यक्रमासाठी शाळा भाड्याने देण्याकरिता शिफारस केल्यास किंवा दबावतंत्राचा वापर केल्यास तो स्पष्टपणे फेटाळून लावण्याचे निर्देश आयुक्त वाघ यांनी दिले आहेत; अन्यथा संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी तसेच आयोजकांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई केली जाणार असल्याचा आदेश आयुक्त जितेंद्र वाघ यांनी जारी केला.

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका